oga Day Celebration (late post)
मन शांत व एकाग्र होण्यासाठी योगासने फार महत्त्वाची – सौ. ए. एस. चौगुले
आप्पासाहेब बिरनाळे कालेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे दि. 21/06/2024 रोजी योग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सुरवातीला प्रमुख व्याख्याती म्हणून – सौ. ए. एस. चौगुले एम एड च्या माजी विद्यार्थिनी होत्या. यासंदर्भात त्यांनी असे सांगितले की, अभ्यास सुरू करण्यापूर्वी सूक्ष्म व्यायाम जरूर करावा. त्यामुळे स्नायू, मज्जातंतू व हाडांचे सांधे मोकळे होवून हालचाली सुलभ होतील व आसनस्थिती जमण्यास सोपे होईल. त्यामुळे शरीर सुलभ होण्यासाठी योग फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रमुख उपस्थिती असणाऱ्या डॉ दिपा बिरनाळे यांनी प्रशिक्षणार्थी कडून विविध प्रकारचे आसने करवून घेतली. यावेळी बी.एड. व एम.एड.चे सर्व प्रशिक्षणार्थी, प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.