आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मधील एम.एड. विभागाची
” “बालभारती” शैक्षणिक भेट संपन्न ” सांगली. मंगळवार दि.27/08/2024.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर एम.एड. अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण आंतरवासीता अंतर्गत आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथील एम.एड. विभागाची “बालभारती” कार्यालय, तसेच पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, कोल्हापूर येथे आज भेट दिली. यावेळी संपूर्ण बालभारती परिसर, तेथील स्वच्छता प्रत्येक विभागाची सातत्याने चाललेली कामे, तेथील कर्मचारी यांच्यातील आपुलकीचे नाते हे पाहून आम्ही खूप भारावून गेलो. सुरुवातीस श्री. सचिन जाधव यांनी पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्व कागद, त्याचा दर्जा, त्यासाठी दिली जाणारी टेंडर प्रक्रिया हे सर्व अतिशय योग्य क्रमाने माहिती दिली.एम.एड. प्रशिक्षणार्थीनी अतिशय शांतपणे ही सर्व माहिती ऐकून सर्व माहिती नमूद करून घेतली. त्यानंतर बालभारती कार्यालय इमारतीची रचना, एकूण चार मजली इमारत, प्रत्येक विभागाची पाहणी करून पुस्तकांचे वितरण करताना स्वतंत्र विभाग कसे केले आहेत. यासंबंधी श्री. सचिन जाधव यांनी सुरेख मार्गदर्शन केले. चारही मजले, तेथील पुस्तक व्यवस्थापन करणे, किती क्लिष्ट गोष्ट आहे. हे या वेळेस समजले. येथील कर्मचारी अतिशय शांतपणे व सराईतपणे काम करताना दिसत होते. हे सर्व पाहत असताना सर्व एम.एड. प्रशिक्षणार्थीनी, तसेच सहा. प्राध्यापक यांनी प्रत्येकाला हवी असणारी पुस्तके खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही. यानंतर सर्वांनी बालभारती कार्यालय भांडार व्यवस्थापक श्री. किशोर पाटील यांनी दिलेल्या चहाचा आस्वाद घेत त्यांचे
कामाचा अनुभव आम्हा सर्व प्राध्यापकांनी त्यांच्याकडूनच ऐकला. त्यानंतर कार्यालय आवारात एक छोटासा कार्यक्रम घेतला गेला यामध्ये सुरुवातीस प्रा. प्राजक्ता होनमाने यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये या भेटी मागील उद्देश स्पष्ट केला. व भांडार व्यवस्थापक श्री किशोर पाटील यांनी भेटीच्या परवानगी पासून आत्तापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.
त्यानंतर बालभारती कार्यालय प्रमुख व भांडार व्यवस्थापक श्री. किशोर पाटील यांनी बालभारती स्थापने मागील उद्दिष्टे, पुस्तकांची संख्या, वितरण व्यवस्था याविषयी संपूर्ण मार्गदर्शन केले. व आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये होत असणारे भविष्यातील शैक्षणिक उपक्रम यासाठी बालभारती कार्यालय सदैव खुले राहील. अशी ग्वाही दिली. त्यानंतर प्रा. सतीश चांदणे यांनी या भेटी मुळे आमच्या प्रशिक्षणार्थी ना काम करण्याची नवी प्रेरणा व ऊर्जा मिळाल्याचे आवर्जून सांगितले शेवटी एम.एड. प्रशिक्षणार्थी प्रियांका पाटील यांनी आभार मानले. व कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एम.एड.चे सहयोगी प्रा. इनामदार आर. आय., सहा.प्रा. पाटोळे व्ही. एन. सहा.प्रा.माने एस.जी. ग्रंथपाल वाघ टी. ए. उपस्थित होते. सदरच्या शैक्षणिक भेटी मागे संस्थापक अध्यक्ष श्री. बबनराव बिरनाळे चेअरमन श्री. समीर बिरनाळे सर डायरेक्टर श्री. सागर बिरनाळे सर, प्राचार्य डॉ. पी. के. पाटील सर, डॉ. दिपा बिरनाळे यांची प्रेरणा मिळाली.