आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये नवरात्री निमित्त हादगा व दांडिया उत्साहात संपन्न”* सांगली गुरुवार दि.10/10/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. येथे हादगा तसेच रास दांडियाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळपासून सर्व बी.एड., एम.एड. प्रशिक्षणार्थिनी विविध प्रकारच्या वेशभूषेत आले होते. (राधा, गवळणी, कृष्ण, गोपिका इ.) तसेच सर्व प्राध्यापकांनी देखील त्या स्वरूपात आपल्या वेशभूषा केल्या होत्या त्यांनी सर्व विदयार्थ्यांकडून अतिशय छान पद्धतीने गरबा नृत्याची तयारी करवून घेतली होती. तसेच सर्व प्रशिक्षणार्थी तसेच प्राध्यापकांनी देखील त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच त्यापूर्वी हादगा व गरबा या पारंपरिक नृत्याचे कौशल्य प्रशिक्षणार्थीत निर्माण व्हावा हादेखील त्यामागील प्रमुख उद्देश होता. यादरम्यान विदयार्थ्यांनी हादगा साजरा करताना आणलेल्या विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद सर्वांनी मिळून घेतला. त्यामुळे एक वेगळा आनंद सर्वांना प्राप्त झाला. यावेळी बहुसंख्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ पी. के. पाटील सर्व बी.एड. एम.एड.चे सहा. प्राध्यापक यांनी सर्व कार्यक्रम छान पद्धतीने पार पडतील यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे हा कार्यक्रम उत्कृष्ट झाला.