आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “गुरुपौर्णिमा” उत्साहात संपन्न
दि. 20/07/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “गुरुपौर्णिमा” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. पी. के. पाटील तर प्रमुख उपस्थिती सहा.प्रा.डॉ. दिपा बिरनाळे यांची होती. त्यानंतर एम. एड. व बी. एड प्रशिक्षणार्थी नी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये दिव्या पाटील,, वैशाली कारंडे, श्रुती पवार, इ चा समावेश होतो. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. पाटील यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्या अध्यक्षीय मनोगतास सुरवात केली. ते म्हणाले, शिक्षकांने आयुष्यभर घडवलेल्या विद्यार्थ्यापैकी किमान डझनभर विद्यार्थ्यांना तरी आपण आपल्या नावीन्यपूर्ण, तसेच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण गुणामुळे लक्षात राहिलो पाहिजे तर आणि तरच एक चांगला गुरु होउ शकतो. नसेल तर आपण फक्त शिक्षकच उरतो. त्यानंतर त्यांनी जीवनात जगण्यासाठी कुटुंब, मित्र, सहकारी यांचे बरोबर सौहार्दपूर्ण वातावरण राखणे का गरजेचे आहे. व आपण व्यावहारिक तेने कसे जगले पाहिजे हेदेखील दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे सांगून पटवून सांगितले, त्यानंतर एम.एड. प्रशिक्षणार्थी मोईन शिकलगार यांनी आभार मानले. यावेळी बी.एड.व एम.एड.चे बहुसंख्य प्रशिक्षणार्थी, सर्व बी.एड. व एम.एड.चे सर्व सहयोगी व सहायक प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमांस संस्था चेअरमनसो श्री समीर बिरनाळे सर तसेच संस्था डायरेकटरसो. श्री. सागर बिरनाळे सर यांचा सतत पाठिंबा असतो त्यामुळेच असे कार्यक्रम यशस्वी होतात. सदरच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन श्रुतिका शिंदे यांनी केले होते.