आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “School Connect Program” नावीन्यपूर्ण कार्यशाळा व Stakeholders meeting उत्साहात संपन्न
दि.27/07/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “School Connect Program” नावीन्यपूर्ण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. NEP-2020 च्या अनुषंगाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम बी.एड. आंतरवासीता अंतर्गत होता. सदर कार्यक्रमामध्ये stakeholders ची meeting देखील आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रास्ताविक व स्वागत सहा.प्रा.डॉ. दिपा बिरनाळे यांनी केले. सहा. प्रा चांदणे एस व्ही. आणि सहा प्रा होनमाने पी.पी. यांचे हस्ते मान्यवर मुख्याध्यापकांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले सहा.प्रा.डॉ. दिपा बिरनाळे यांनी केले तसेच कॉलेज चे IQAC Coordinator सहा.प्रा. कीर्तिकर वाय.एस. यांनी School Connect Program व Stakeholders meet याचे स्वरूप सविस्तरपणे सांगितले. त्यानंतर school connect program मध्ये सहभागी मुख्याध्यापक गरांडे सर, तसेच ढेरे सर, चौगुले मॅडम, भोंडवे सर करनाळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर यासंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली विचारलेल्या शंकाचे निरसन डॉ पी. के. पाटील सर व सर्व प्राध्यापकांनी केले. त्यानंतर प्राचार्य डॉ.पी. के. पाटील सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.यामध्ये कॉलेज च्या चाललेल्या वाटचालीबाबत माहिती दिली.झालेल्या सर्व चर्चेचा खुलासा करून उपस्थितांच्या सर्व प्रश्नांची
समर्पक उत्तरे दिली यादरम्यान सहा प्रा माने आर बी व सहा.प्रा. माने एस.जी.यांनी feedback फॉर्म देणे तसेंच नावनोदणी चे उत्तम कार्य वाघ मॅडम यांनी पार पाडले. तसेच जेवण विभाग (पाटोळे मॅडम, काटकर सर) तसेच सर्व विभागानी आपापले योग्य नियोजन केले होते त्यानंतर महाविद्यालयाच्या कॅन्टीन मध्ये हरिभाऊ यांनी बनवलेल्या दुपारच्या यथेच्छ भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतले त्याचबरोबर सर्वांनी या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमात पुढील कार्यशाळेचे विषय याबाबत चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमात स्टेज व्यवस्था सहा प्रा माळी एस. के. तसेच आभार सहा प्रा होनमाने.पी पी. यांनी मानले या कार्यक्रमासाठी संस्था चेअरमन समीर बिरनाळे सर, डायरेकटरसो सागर बिरनाळे सर यांनी दिलेल्या सपोर्टमुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात.