“आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमानी साजरा ”
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान-स्रोत केंद्र व आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. यांचे संयुक्त विद्यमाने, भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सार्थ आदरांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०१५ पासून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. यानुसार सन २०१५ पासून शिवाजी विद्यापीठामध्ये वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने व अत्यंत उत्तम पद्धतीने साजरा केला जातो. वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाजाची जडण घडण, व्यक्तिमत्व विकास, साहित्य विकास आणि भाषा विकास यासाठी वाचन संस्कृतीचा विस्तार व विकास अत्यावश्यक असल्यामुळे वाचन प्रेरणा दिन उपक्रम उत्साहात साजरा करणे गरजेचे आहे. या वाचन प्रेरणा दिवसाच्या अनुषंगाने यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे वाचन करावे. असे सांगितले होते त्यानुसार आम्ही दि. १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ जसा बैनर तयार करून घेतला व कार्यक्रम साजरा करताना तो योग्य ठिकाणी सर्वाच्या निदर्शनास येईल अशा पद्धतीने लावून घेतला दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.०० यादरम्यान या उपक्रमाचे आयोजन केले, यामध्ये सकाळी १०.३० ते
[12:05 pm, 16/10/2024] Mom: १०.४५ या वेळेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी के पाटील यांनी केले व सकाळी १०.४५ ते ११.०० या वेळेत प्रत्यक्ष वाचन बी. एड., एम.एड प्रशिक्षणार्थिकडून करवून घेतले सदर कार्यक्रमामध्ये संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, माजी विद्यार्थी इ. यांचा सहभाग होता. सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक होनमाने पी. पी व आभार सहा. प्रा डॉ. दिपा बिरनाळे यांनी मानले.