आप्पासाहेब बिरनाळे एम. एड. महाविद्यालयात 2022-24 प्रशिक्षणार्थिचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न..* शनिवार दि.25/05/2024 आप्पासाहेब बिरनाळेकॉलेज ऑफ एज्युकेशन (एम. एड.) सांगली. महाविद्यालयात 2022-24 मधील प्रशिक्षणार्थिंचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एम.एड. अभ्यास क्रम एकूण दोन वर्षात व चार सेमिस्टर मध्ये पूर्ण केला जातो. त्यांतर्गत विविध प्रा त्यक्षिके, सेमिनार तसेच इतर सर्व कार्य पूर्ण करून घेतले जाते.. सदर परीक्षा कालच संपल्या व त्यानुसार आज त्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ या सर्व प्रशिक्षणार्थिनी स्वयंस्पुर्थीने आयोजित केला होता. यामध्ये महादेव केदार, नानासाहेब शेजाळ इतर सर्व सेम IV च्या प्रशिक्षणार्थिनी अतिशय योग्य नियोजन केले होते. सुरवातीला सर्व उपस्थितानी अतिशय स्वादिष्ट अशा भोजनाचा आस्वाद घेतला. व प्रत्यक्ष कार्यक्रमाचे उदघाट्न एका रोपट्यास पाणी घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश शिंदे यांनी तर सूत्रसंचलन महादेव केदार यांनी केले होते. सुरवातीला माधुरी कुंभार, धनश्री अजेठराव, अनिता पाटील, नानासाहेब शेजाळ, महादेव केदार, दीपाली माने इ प्रशिक्षणार्थिनी नी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सहा.प्रा. कीर्तिकर वाय एस, सहा.प्रा. चांदणे एस. व्ही., सहा.प्रा.पाटोळे व्ही. एन. सहा.प्रा.होनमाने पी.पी., सहा.प्रा.माने एस. जी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर सर्व मान्यवरांना भेट वस्तू 2022-24 च्या प्रशिक्षणार्थी चे हस्ते देण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. के. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. व प्रशिक्षणार्थिना मार्गदर्शन केले. यावेळी सहा प्रा.डॉ. दिपा बिरनाळे, सहा. प्रा. जाधव एस.ए सहयोगी प्रा. डॉ इनामदार आर आय, सहा प्रा. पाटील आर ए., ग्रंथपाल वाघ टी. ए., श्री. समीर मुजावर, श्री कौतुक काटकर, भरत खवाटे, अमोल सकळे उपस्थित होते. यावेळी सेम IV मधील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस संस्था चेअरमन श्री. समीर बिरनाळे सर, संस्था डायरेकटर श्री. सागर बिरनाळे सर, यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या पाठिंब्यामुळे सदरचे कार्यक्रम यशस्वी होत आहेत.