“आप्पासाहेब बिरनाळे बी.एड. कॉलेज शैक्षणिक वर्ष 2022-24 चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न ”
गुरुवार दि.25/04/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे शैक्षणिक वर्ष 2022-24 च्या छात्रध्यापकांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी बी एड छात्रध्यापिका महादेवी नागापुरे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी छत्रध्यापकांनी महाविद्यालयास एक आठवण रूपाने छोटीशी भेट म्हणून 1 cooler व 1 Water Purifier देण्यात आला. त्यानंतर एकूण बी एड मधील दोन वर्षाच्या कालावधीत आलेले अनुभव अनंत शहापुरे, रमेश खबाले, विश्वभर बंडगर, नम्रता एरंडोले यांनी शेअर केले. त्यानंतर प्राध्यापक मनोगतात सहा प्रा एस के माळी व सहा प्रा वाय एस कीर्तिकर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ पी. के. पाटील सर यांनी आपण फक्त परीक्षार्थी न राहता आजन्म विदयार्थी असावे व त्यानुसार इथून पुढील आपल्या हाती येणाऱ्या सर्व पिढ्याना खरे ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले. शेवटी छात्रध्यापिका सुचेता पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. व कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमास प्राचार्य डॉ पी के पाटील डॉ दीपा बिरनाळे सहा प्रा एस के माळी सहा प्रा वाय एस कीर्तिकर, सहा प्रा माने आर बी, सहा प्रा चांदणे एस व्ही सहा प्रा पाटोळे व्ही एन सहा प्रा होनमाने पी पी सहा प्रा माने एस बी सहा प्रा कदम व्ही व्ही सहयोगी प्रा डॉ आर आय इनामदार सहा प्रा राहुल पाटील, समीर मुजावर, कौतुक काटकर, भारत खवाटे, अमोल इ. उपस्थित होते सदर कार्यक्रमांस संस्था चेअरमन श्री समीर बिरनाळे, संस्था डायरेकटर श्री सागर बिरनाळे यांनी शुभेच्छा दिल्या व असेच विद्यार्थी आपल्या संस्थेतून आपले नाव उज्ज्वल करोत अशा सदिच्छा दिल्या.